बातम्या
शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीतच...
By nisha patil - 1/29/2025 1:48:42 PM
Share This News:
शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीतच...
पंप दुरुस्तीला आणखी दोन दिवस लागणार...
तांत्रिक अडचणींमुळे शनिवारपासून पाणीपुरवठा बंद राहिल्याने मंगळवारीही शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय. तर पंप दुरुस्तीला आणखी दोन दिवस लागणार आहेत. रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आलंय.
पंप नादुरुस्त होत असल्याने पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. यामुळे निम्म्या शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा झालाय. रविवारपासून अशीच स्थिती आहे. सुरू असलेल्या दोन पंपावरच पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसभर ए, बी, ई वॉर्डासह कसबा बावड्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय.
शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीतच...
|