कोल्हापूर : शहरातील ई वॉर्डचा पाणीपुरवठा शनिवार, रविवारी बंद

Water supply to E ward in the city will be closed on Saturday and Sunday


By nisha patil - 1/12/2023 3:49:52 PM
Share This News:



शहरातील थेट पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे फुलेवाडी येथील काम शनिवारी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा पाणीपुरवठा बंद  असणार आहे.

कोल्हापूर शहरातील सर्वात मोठ्या ई वॉर्डसह परिसरातील पाणीपुरवठा शनिवारी आणि रविवारी  बंद राहणार आहे. तसेच सोमवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील कसबा बावडा टाकीवरील संपूर्ण बावडा परिसरात पाणीपुरवठा होणार नाही . तसेच महापालिकेच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने  केले आहे.


कोल्हापूर : शहरातील ई वॉर्डचा पाणीपुरवठा शनिवार, रविवारी बंद