बातम्या
आत्ता टंचाईग्रस्त गावांना होणार टँकरने पाणीपुरवठा
By nisha patil - 6/20/2023 5:23:34 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करून पाणीपुरवठा करावा असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .सीमा भागातील शेतीसाठी उपसा बंदी करावी आणि पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावं याबाबत बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पाणीटंचाई बाबत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते .यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, जुने दानवाड, नवे दानवाड, घोसरवाड आणि हेरवाड या गावातील टंचाईची परिस्थिती स्पष्ट केली. या भागात आवश्यक पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. दूधगंगा खोऱ्यात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर देखील उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी यड्रावकर यांनी केल्या . कर्नाटक सीमेलगत दूधगंगा पूर्णतः कोरडी पडली आहे. सुळकुड बंधाऱ्यापर्यंत जयंती पाणी असून बंदराच्या पुढे कर्नाटक राज्यातील बंधारे आहेत .त्यामुळे दूधगंगा धरणातून पाणी पोहोचवणे, सध्या शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केलं आहे. यानंतर जिल्हाधिकारी रेखावर यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत कर्नाटकातील गावात शेतीसाठी उपसाबंदी लागू करावी आणि उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे अशी सकारात्मक चर्चा केली .
आत्ता टंचाईग्रस्त गावांना होणार टँकरने पाणीपुरवठा
|