बातम्या

विजयादशमी सण साजरा करण्याच्या पद्धती

Ways of celebrating Vijayadashami festival


By nisha patil - 10/23/2023 7:06:01 AM
Share This News:



या दिवशी सरस्वतीतत्व सगुणाचा अधिक्य भावाच्या निर्मितीतून बीजरुपी अप्रकटावस्था धारण करते,म्हणून या दिवशी तिचे क्रियात्मक पूजन आणि विसर्जन केले जाते .

महाराष्ट्रात कातकरी किंवा आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हंटले जाते. तसेच बंजारा व इतर समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात .

घराला आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात .दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे .यंत्रे ,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. आणि संध्याकाळी सर्व लोक एकत्र येत सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो.


विजयादशमी सण साजरा करण्याच्या पद्धती