बातम्या
छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवू : श्री.राजेश क्षीरसागर
By nisha patil - 3/23/2024 10:20:44 PM
Share This News:
छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवू : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
कोल्हापूर दि.२३ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची सामाजिक कार्याची शिकवण, लोकांना न्याय देण्याची धडपड सुरूच ठेवल्याने कोल्हापूर उत्तरसह कोल्हापूर दक्षिण मधील नागरिकांचेही पाठबळ वाढत चालले आहे. ना दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व "दक्षिणोत्तर" या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची गंगा वाहती करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर शहराचा अविभाज्य घटक असून याठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभाग शहरप्रमुख श्री.प्रभू गायकवाड यांच्या शिवसेना विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज साध्यापद्धतीने पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दक्षिण मतदारसंघातील राजकीय नेत्यांनी नागरिकांना फक्त गाजर दाखविण्याचे काम केले आहे. हा मतदारसंघ दोन गटांच्या वादातच अडकला आहे. त्यामुळे विकास कामे तर दूरच नागरिकांच्या मुलभूत सोईसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. युवापिढीस राजकारणात गुंतवून स्वत: चा स्वार्थ साधण्याच्या संधीसाधू प्रवृत्तीस या मतदारसंघातील नागरिक कंटाळले आहेत. त्याचमुळे शिवसेनेस पाठबळ वाढत आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण दोन्ही मतदारसंघातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे दक्षिण - उत्तर असा कोणताही मतभेद न करता लोकांना न्याय देण्याच काम करत आलो आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणी प्रमाणे ८० टक्के समाज कारणाचा मूलमंत्र वापरून कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मध्ये विकास कामांची गंगोत्री प्रवाहित करू. ओपन जिम, खेळणी, क्रीडांगणे, वॉकिंग ट्रॅक, समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना विकास पर्वाकडे घेवून जाऊ, अशी ग्वाही दिली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभाग जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख श्री.प्रभू गायकवाड, उपशहरप्रमुख कपिल केसरकर, प्रदीप मस्के गुणवंत नागतळे अमित जाधव रुपेश डोईफोडे निहाल मुजावर संजय गाडीवडार प्रदीप देसाई अभिजीत पवार दयानंद नागटिळे अक्षय पट्टण अमर जराग प्रसाद उर्फ भाऊ पाटील अर्जुन शिंदे किसनराव कल्याणकर किरण यादव निवास राऊत चंद्रकांत दिघाल योगेश मांजरे गौतम कांबळे रोहित भाले अक्षय शाहीर संतोष मस्के पिंटू भोईटे संजय नडवणे यांच्यासह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवू : श्री.राजेश क्षीरसागर
|