बातम्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू; आमदार सतेज पाटील

We will raise our voice in the upcoming winter session regarding the issue of Anganwadi employees


By nisha patil - 11/25/2023 11:27:27 PM
Share This News:



 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू; आमदार सतेज पाटील 

कोल्हापूर - राज्यातील सरकार हे तीन पायाच, भरकटलेल सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू. अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी यासह इतर विविध मागण्याकरिता, 
राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 4 डिसेंबर पासून संपावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज शनिवारी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालय येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीन, विविध मागण्यांच निवेदनही आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांना दिले. मानधन वाढीसह इतर विविध मागण्या गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामुळ, या मागण्यांची सोडवणूक व्हावी याकरिता त्यांनी प्रयत्न करावेत. अशी मागणीही यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीन कॉम्रेड अतुल दिघे यांनी यावेळी बोलताना केली.  दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी, अंगणवाडी या प्राथमिक शिक्षणाचा पाया असल्याने अंगणवाड्या चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजेत. यासाठी आपले नेहमीच प्रयत्न असतात. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा प्रश्न त्याचबरोबर त्यांच्या इतर मागण्या बाबत येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. मात्र सरकार बदलले आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र काँग्रेस सह महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या सर्व आमदारांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत एकत्र येण्याची विनंती करू. असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय विचारांचा महाराष्ट्र आता बाजूला जात आहे.  राज्यातील सरकार हे भरकटत चालले असल्याची टिकाही त्यांनी केली. हे सरकार तीन पायाचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी एखादी अधिकाऱ्याची बदली केली, की दुसरा मंत्री ही बदली रद्द करतो. त्यामुळे या सरकारमध्ये समन्वय राहिलेला नाही. अशी टीकाही त्यांनी केली. मात्र विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नावर सक्षमपणे आम्ही आवाज उठवू. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात निश्चितपणे याबाबत आवाज उठवला जाईल. अशी ग्वाही देखील आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली.

आमदार ऋतुराज पाटील यांनी, तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सरकार बदलले. आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. मात्र सत्तेत असलेलं राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही.. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सार्थ आहेत. त्यामुळे तुमच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे अशी ग्वाही देखील आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली. काँग्रेस मध्ये जे युवा आमदार आहेत त्यांना देखील एकत्र घेवू. आम्ही सर्वजण जबाबदारीने अधिवेशनात आवाज उठवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत पाठपुरावा करू. जो शब्द दिला आहे तो पुर्ण करू. अशी ग्वाही त्यांनी दिली. 
यावेळी माजी जि प उपाध्यक्ष शशिकांत खोत, संगीता पवार, उषा कोडोवकर, सुनिता कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू; आमदार सतेज पाटील