बातम्या

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवू...

We will show Mahavikas Aghadi their seats in the coming assembly elections


By nisha patil - 2/8/2024 10:27:42 PM
Share This News:



जनतेची दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत यशाच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीला उद्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांनी केले. कोल्हापूर महानगर आणि पश्चिम जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात ते बोलत होते हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.या अधिवेशनास माजी आमदार सुरेशराव हळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी आमदार अमल महाडिक, राजे समरजितसिंह घाटगे, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमू आण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.


येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवू...