बातम्या

शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावू : राजेश क्षीरसागर

We will solve the issue of saline land in Shirol taluka permanently Rajesh Kshirsagar


By nisha patil - 1/6/2023 6:50:59 PM
Share This News:



कोल्हापूर  प्रतिनिधी क्षारपड जमिनीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. विशेषत: कृष्णा, पंचगंगा काठची दीड लाख एकराहून अधिक काळीभोर शेती विनापीक बनली आहे. उत्पादनाचा अति हव्यास आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने ही दुर्दशा उद्भवली आहे. अशी जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न शेतकरी, शासन, कृषी शास्त्रज्ञ, शेती अभ्यासक, लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होत आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी नापीक जमिनी पुन्हा पिकाऊ करण्याच्या दृष्टीने आवश्यक योजनांची व्यापक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून, शिरोळ तालुक्यासह राज्यातील इतर तालुक्यातील क्षारपड जमिनींचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. आज क्षीरसागर यांनी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीची पाहणी केली. यावेळी शिरोळच्या दत्ता साखर कारखान्याने क्षारपड जमीन पुन्हा लागवडीसाठी पिकाऊ करण्यासाठी केलेल्या प्रकल्पाची पाहणीही क्षीरसागर यांनी केली.
यावेळी क्षीरसागर यांनी, माती परीक्षण, खतांचा वापर, सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न आणि आलटून पालटून पिके कशी घ्यायची, प्रतिहेक्टर उत्पन वाढीसाठी कोणते प्रयत्न करावेत. योग्य पाणी, खते, बियाणे आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान वापरून शेतकरी बांधवांनी शास्त्रीय शेती केल्यास जमिनीचे पुनर्जीवन होवू शकते. शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना - भाजप युती शासन सक्षम असून, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने राबविलेला उपक्रम स्तुत्य असून, याचे अनुकरण राज्यभरात व्हावे यासाठीही शासन स्तरावर प्रयत्नशील आहे. यासह क्षारपड जमिनीस सुपीक करण्यासाठी शासन स्तरावर अनुदानाच्याविषयीही शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न करू, असे सांगितले.यावेळी शिरोळ तहसीलदार जमदाडे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना व इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे, संभाजी चव्हाण, बाबा पाटील, सय्यद, जयसिंग माने, राजाराम बेळंके आदी उपस्थित होते.


शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावू : राजेश क्षीरसागर