बातम्या

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत पाडू -अजित पवार गटाचा इशारा

We will topple the Chief Ministers son in the election  Ajit Pawar group's warning


By nisha patil - 3/13/2024 8:32:33 PM
Share This News:



आम्ही  मुख्यमंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत पाडू -अजित पवार गटाचा इशारा

मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीआधीच जागावाटपावरुन सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन गटात धुसफूस सुरु झालीय. एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांना थेट खुलं आव्हान दिल्यानं पवार गट चांगलाच संतापलाय. विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर आगपाखड केलीय. बारामती मतदारसंघ कुणाची मक्तेदारी नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर बेछूट आरोप केलेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांविरोधात लोकसभेच्या रणांगणात उतरण्याची घोषणा करत विजय शिवतारेंनी पवारांनाच आव्हान दिलंय. त्यावरुन आता थेट खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघाचा उल्लेख करत, मुख्यमंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत पाडू असा सूचक इशारा अजित पवार गटानं दिलाय.


आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत पाडू -अजित पवार गटाचा इशारा