बातम्या
तरूण वयातच दात झाले कमकुवत ? हे तर 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण
By nisha patil - 3/7/2023 7:17:06 AM
Share This News:
आजकाल बऱ्याच जणांना तरूणवयातच दातदुखीची (Teeth pain) समस्या असल्याचे दिसून येते. तुमचं वयही 20 से 30 च्या दरम्यान असेल आणि तुम्हाला दातांत वेदना किंवा काही त्रास जाणवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्याचे हे संकेत आहेत. दातांना हाडांचा सपोर्ट असतो. जर हाडं कमकुवत झाली असतील किंवा हिरड्यांमध्ये एखादी समस्या अथवा इन्फेक्शन झाले असेल तर त्याचा परिणाम दातांवर होतोच.
हिरड्यांमधील संसर्ग आणि हाडं कमकुवत होणं या सर्वांचा थेट परिणाम आपल्या दातांच्या आरोग्यावर होतो. हे सहसा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. काही प्रकरणांमध्ये, तोंडाच्या खराब आरोग्यामुळे देखील लोकांचे दात कमकुवत होऊ शकतात.
कशी घ्याल दातांची काळजी ?
ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या मौखिक आरोग्याची म्हणजेच ओरल हेल्थची पुरेशी काळजी घेणे अतिशय महत्वाचे असते. त्यासाठी दातांची नियमितपणे सफाई करणे आणि रेग्युलर चेकअप करणेही गरजेचे आहे. एवढंच नव्हे तर चांगल्या दातांसाठी हाडंही मजबूत असली पाहिजेत. त्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी असले पाहिजे. तुमचे दात कमकुवत वाटत असतील किंवा सारखे हलत असतील तर शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी आहे की नाही याची तपासणी जरूर करून घेतली पाहिजे.
जर डी व्हिटॅमिन कमी असेल, तर या कमतरतेमुळेच आपले दात कमकुवत होत आहेत, हे स्पष्ट होते. शहरी भागात राहणाऱ्या बहुतांश लोकांमध्ये 'ड' जीवनसत्त्वाची किंवा डी व्हिटॅमिनची कमतरता आढळून येते आणि त्याचा त्यांच्या दातांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अशावेळी व्हिटॅमिनच्या तपासणीसोबतच शरीरात पुरेसे कॅल्शिअमही आहे की नाही याचीही चाचणी करून घ्या. कॅल्शियमच्या कमतरतेमुळेही दातांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी रहावे सतर्क
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा रुग्णांमध्ये दात पडण्याची समस्या अधिक असते. अशा परिस्थितीत जर तुमची ब्लड शुगर लेव्हलही वाढलेली असेल तर धोका पोहोचू शकतो. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे तसेच आहारही घ्या. पुरेसा व्यायाम करणेही या परिस्थितीत फायदेशीर ठरते.
या गोष्टींची घ्या काळजी
तंबाखूचे सेवन आणि मद्यपान करू नये.
प्रत्येकाने सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा दात स्वच्छ घासावेत. तसेच काहीही खाल्ल्यास खळखळून चूळ भरावी.
हिरड्यांचे आरोग्यही चांगले रहावे, यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
दातांसदर्भात कोणताही त्रास किंवा समस्या जाणवत असेल तर वेल न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तरूण वयातच दात झाले कमकुवत ? हे तर 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण
|