शैक्षणिक
“ पाणथळ जागा जगभरातील जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण ” – प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार
By nisha patil - 8/2/2025 2:20:20 PM
Share This News:
“ पाणथळ जागा जगभरातील जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण ” – प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार
कोल्हापूर, दि. 08 – जागतिक पाणथळ प्रदेश दिवस 2025 च्या निमित्ताने, विवेकानंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे बी.एस्सी विद्यार्थी रंकाळा तलाव व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता मोहिम राबवली.
प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी “पाणथळ जागा जगभरातील जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण” असा संदेश देत, पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. जलप्रदूषण, निचरा, अनिर्बंध वापर आणि इतर कारणांमुळे पाणथळ प्रदेश धोक्यात असल्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ. पी. पी. जाधव यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दांगट व रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग यांच्या सहकार्याने करण्यात आले.
“ पाणथळ जागा जगभरातील जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण ” – प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार
|