बातम्या

माता सीतेची 12 नावे कोणती? जाणून घ्या प्रत्येक नावाच महत्व

What are the 12 names of Mother Sita


By nisha patil - 1/24/2024 7:36:03 AM
Share This News:



आज आम्ही तुमच्यासोबत माता सीतेच्या 12 नवांची चर्चा करणार आहोत आणि सांगणार आहोत की या नवांच्या मागे काय वेगळेपण आहे. श्रीरामचरितमानसमध्ये भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या जीवन बद्दल विस्तृत वर्णन मिळते. तसेच भगवान श्रीरामांच्या इतर नवांचे पण उल्लेख श्रीरामचरितमानसमध्ये केलेला आहे. आज आपण जाणून घ्याल की, माता सीताचे इतर नावे का आणि कशासाठी ठेवली. जानकी 
माता सीतेच्या वडिलांना शास्त्रात जनक ही संज्ञा दिली गेली होती राजा जनक हे त्यांची मुलगी सीतेवर  खूप प्रेम करायचे. यामुळेच माता सीतला जानकी म्हणतले जाते.
 
लक्षाकी 
माता सीतला धनाची देवी माता लक्ष्मी मानले जाते. त्यांची प्रजापण त्यांना लक्ष्मी स्वरुप मानायची व त्यांना लक्षाकी म्हणून संबोधित करायची.भूमि 
मान्यता आहे की माता सीतेचा जन्म शेतात नांगर चालवतांना झाला होता. धरती मधून जन्म झाल्यामुळे त्यांना शास्त्रामध्ये  भूमि नवाने संबोधित केले गेले आहे.मैथिली 
महाराज जनक यांच्या राज्याचे नाव मिथिला होते. या कारणामुळे त्यांना मिथिलाचे लोक मिथिली म्हणायचे. म्हणून माता सीतेचे हे नाव शास्त्रात मिळते. 
 
सीता 
नांगरच्या अग्र भागाला सीत म्हणतात. सोबतच माता सीतेचा जन्म शेतात नांगर चालवतांना नांगरच्या पुढच्या भागाने कलश निघाला त्या वेळी झाला आहे असे मानले जाते. म्हणून सीतमुळे त्यांचे नाव सीता पडले.
 
मृण्मयी 
माता सीता मन-वचन कर्माने पवित्र होत्या आणि मातीलापण शास्त्रात पवित्र मानले  आहे यामुळे धरणीतून जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव मृण्मयी ठेवण्यात आले.
 
वैदेही 
धार्मिक मान्यता आहे की राजा जनक यांना विदेहराज जनक असे पण म्हणायचे आपल्या वडिलांच्या नावावरून त्यांच नाव वैदेही होते. 
 
सिया 
अत्यंत सुंदर आणि सुशील असल्यामुळे माता सीता या सिया म्हणून ओळखल्या गेल्या असे म्हणतात की
 त्यावेळेस माता सीता एवढे सुंदर पृथ्वीवर कोणी नव्हते. 
 
वानिका 
माता सीताने आपल्या जीवनातील अधिकांश भाग हा वनात व्यतीत केला आहे पाहिले १४ वर्ष त्यांनी श्रीरामांसोबत वनवास भोगला नंतर अयोध्यात परतल्यावर पुन्हा त्या वनात निघून गेल्या आणि पूर्ण जीवन वाल्मीक यांच्या आश्रमात राहिल्या. यामुळे त्यांचे नाव वानिका संबोधले गेले. 
 
जनकनंदिनी 
महाराज जनक यांची पुत्री असल्या कारणाने माता सीता जनकनंदिनी ओळखली गेली. 
 
क्षितिजा 
माता सीताचे एका नावला क्षतिज अर्थात आकाशाशी जोडून पाहिले गेले. कारण माता सीता शेतात मोकळ्या आकाशाखाली प्रकट झाल्या होत्या यकरिताच माता सीतला क्षितिजा नावाने शास्त्रामध्ये संबोधले गेले आहे.
 
सीताशी 
माता सीताचे एक नाव सीताशी पण मानले आहे या नावाला दैवीय गुण युक्त मानले जाते हेच कारण आहे की माता सीताला सीताशी संबोधले गेले आहे.


माता सीतेची 12 नावे कोणती? जाणून घ्या प्रत्येक नावाच महत्व