बातम्या

ओट्स रोज खाल्ल्याने काय फायदे होतात? वाचा

What are the benefits of eating oats daily


By nisha patil - 9/25/2023 7:33:16 AM
Share This News:



ओट्स रोज खाल्ल्याने काय फायदे होतात? वाचा
 

तुम्हाला जर जीवनसत्त्वे, फायबर, खनिजे, प्रथिने हे सगळं एकाच पदार्थात मिळत असेल? या गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. रोज ओट्सचा एक बाऊल खाल्ल्यानं तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.वजन कमी करायचं असेल, वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर ओट्स हा उत्तम पर्याय आहे. ओट्स मध्ये कॅलरीचं प्रमाण चांगलं असतं. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ओट्स हा उत्तम डाएट आहे.मधुमेह असणारी लोकं ओट्स खाऊ शकतात. ओट्स आरोग्यासाठी चांगले असतात. फायबर असल्यानं रक्तातील साखर नियंत्रित होते त्यामुळे मधुमेह असणारे लोक ओट्स नियमित खाऊ शकतात.ओट्समध्ये बीटा-ग्लुकन  असतं. हे बीटा-ग्लुकन रक्तदाब कमी करतं. रक्तदाब कमी झाल्यास अर्थातच हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. हृदयाचं आरोग्य राखलं जातं.

खूप कमी लोकांना हे माहित असेल की ओट्समुळे डिटॉक्सिफिकेशन होतं. शरीर डिटॉक्सीफाय करणं म्हणजे काय? म्हणजे शरीरातली सगळी घाण काढून टाकणं. ओट्समुळे शरीर डिटॉक्सीफाय होऊ शकतं. ओट्स शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण शरीर स्वच्छ आणि निरोगी होऊ शकते.


ओट्स रोज खाल्ल्याने काय फायदे होतात? वाचा