बातम्या

उलटं चालण्याचा शरीर आणि मेंदूला काय फायदा होतो? वाचा

What are the benefits of walking upside down for the body and brain


By nisha patil - 11/18/2023 8:28:38 AM
Share This News:



19 व्या शतकात “उलटं-चालणं” हा थोडा विक्षिप्त छंद होता, परंतु आजघडीला संशोधनातून हे उघड झालंय की ते तुमचं आरोग्य आणि मेंदूसाठी फायदेशीर असू शकतात.पॅट्रिक हार्मन नावाच्या 50 वर्षीय सिगार-शॉप मालकाने 1915 च्या उन्हाळ्यात एक वेगळंच आव्हान स्वीकारलं - 20,000 डॉलर जिंकण्याची पैज लावत त्यांनी सॅन फ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क शहरांदरम्यान उलटं चालायचं ठरवलं.
 
आपण कुठे जातोय पाहण्यासाठी एका मित्र आणि त्याच्या छातीवर लावलेल्या कारच्या एका छोट्या आरश्याच्या मदतीने हार्मन यांनी 3,900 मैल (6,300 किलोमीटर) प्रवास 290 दिवसांत पूर्ण केला, संपूर्ण प्रवासात त्यांनी प्रत्येक पाऊल उलट दिशेने टाकलेलं.हार्मन यांनी दावा केला की या प्रवासामुळे त्यांच्या पायाचे घोटे इतके मजबूत झालेत की “त्याला कुठलीही इजा करण्यासाठी थेट हातोड्याचाच वापर करावा लागेल."


उलटं चालण्याचा शरीर आणि मेंदूला काय फायदा होतो? वाचा