बातम्या

सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

What are the effects of eating only fruits for three consecutive days


By nisha patil - 11/21/2023 7:30:03 AM
Share This News:



आपल्यापैकी अनेक लोक हे डिटॉक करण्यास प्राधान्य देतात. त्यामागे एकच कारण असतं आणि ते म्हणजे वजन कमी करणं. कारण आपण इतकं खातो की आपलं वजन वाढू लागतं.

अशात आपण रोज नियंत्रणात खातो, पण एखाद्या दिवशी आपण इतकं काही खातो की एकवेळचं जेवण आपण स्किप करतो आणि त्याला डिटॉक्स असं म्हणतात. जेणेकरून आपण जे आधी खाल्ल आहे ते पचेल आणि त्यासोबत आपण वजन नियंत्रणात येईल. डिटॉक्स ही एक प्रक्रिया असून त्यातही अनेक प्रकार आहेत. सध्या सगळ्यात लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे 72 तास फास्टिंग. यात फक्त फळांचे सेवन करण्यात येते. याला फ्रुटेरियन डायट असं देखील म्हणतात.

फ्रुटेरियन डायट केल्यानं तुमच्या शरीरातील सगळ्या गोष्टी नियंत्रणात येतील. त्यासोबतच तुमच्या शरिराला आवश्यक असलेले सगळेचं व्हिटामिन, मिनरल्स, अॅन्टिऑक्सिडंट्स मिळतील असं सगळ्यांना वाटतं. दरम्यान, meditationbynature या इन्स्टाग्राम पेजवरून एक माहिती समोर आली असून असं आपण केल्याल आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

काय आहेत फायदे?
12 तासात तुमची पचन प्रक्रिया चांगली होते. तुमचं शरीर ते जे काही फळं खातंय त्याचं सगळे न्युट्रिएन्ट पूर्णपणे घेण्यास मदत करतं. तर त्यात असलेले डायट्री फायबर हे पोट दुखीपासून अनेक पोटांच्या आजारांपासून हळू हळू आपली सुटका करू लागतं. 24 तासानंतर तुमच्या शरीरातील फॅट कमी होऊ लागतात. अशात तुमचं शरीर हे तुमची एनर्जी वाढवण्यासाठी शरीरातील फॅट्स वापरू लागतं.

फक्त फळं खाल्यास काय वाईट परिणाम होतो?

वजन वाढणं
अनेकांचं वजन हे कमी होऊ शकतं पण फळांमध्ये नॅच्युरल सारख असते त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यातही तुम्ही खूप वेळ फक्त फळांचे सेवन केले तर.

मधुमेहाची चिंता

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी 72 तास फळांवर राहणे टाळायला हवे. कारण फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. किडनीचे विकार असलेल्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो.वजय कमी होत नाही
बरेच लोक हे सगळच्या नाश्त्याला फळं खाण्यास प्राधान्य देतात. काही लोक तर जेवणात देखील फक्त फळं खातात कारण त्याना वजन कमी करायचं असतं.
आरोग्यदायी पर्याय असूनही, फळांचे जास्त सेवन केल्यानं शरीरातील कार्बोहायड्रेट वाढल्यामुळे वजन कमी होत नाही.

गोड खाण्याची इच्छा

सतत फळं खाल्यानं तुमची गोड खाण्याची इच्छा सतत वाढू शकते.


सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?