बातम्या

पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी काय बोलले.. ?

What did PM Modi say in the dressing room of Team India after the defeat


By nisha patil - 11/21/2023 4:39:56 PM
Share This News:



टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील वनडे वर्ल्ड कपची फायनल पाहायला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच हा फायनलचा सामना झाला. मॅच संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. तिथे जाऊन त्यांनी प्रत्येक खेळाडूची भेट घेतली. त्यांची पाठ थोपटली. पराभवामुळे  खेळाडूंचे खांदे पडलेले होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या शब्दांनी खेळाडूंमध्ये हुरुप भरण्याचा, जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 
   

वर्ल्ड कपची फायनल हरल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा झाला होता. खेळाडूंचे चेहरे पडलेले होते. चेहऱ्यावर मनातील वेदना स्पष्ट दिसत होत्या. डोळे भरुन आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना धीर दिला. 
     

ड्रेसिंग रुममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भेटले. त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली. देश तुम्हाला बघतोय, असं होत असतं, असं सांगितलं. त्यानंतर पीएम मोदी राहुल द्रविड यांना भेटले. रवींद्र जाडेजाला भेटताना गुजरातीत चार शब्द बोलले. पंतप्रधान मोदींनी बुमराहला विचारलं, गुजराती येते का? त्यावर थोडी-थोडी असं त्याने उत्तर दिलं. सर्व खेळाडूंशी त्यांनी हस्तांदोलन केलं. सगळ्यांना परस्परांना साथ देण्यास आणि उत्साह वाढवण्याचा संदेश दिला. ड्रेसिंग रुममधून निघताना त्यांनी टीम इंडियाला दिल्लीला येण्याच निमंत्रण देखील दिलं.


पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी काय बोलले.. ?