बातम्या
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री भेटीवर राजू शेट्टी काय म्हणाले?
By nisha patil - 4/1/2024 7:38:33 PM
Share This News:
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री भेटीवर राजू शेट्टी काय म्हणाले?
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही उमटले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी या भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त करताना थेट राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली. यानंतर मुरलीधर जाधव यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडूनही कारवाई करण्यात आली आहे.
मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा जिल्ह्यात राजकीय भूवया उंचावल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे यांची भेट आणि मुरलीधर जाधव यांच्या हकालपट्टीवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्ही बरोबर जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
मुरलीधर जाधव यांनी किमान माझी पत्रकार परिषद पाहायला हवी होती
राजू शेट्टी यांनी सांगितले की, मातोश्रीवर झालेली उद्धव ठाकरेंसोबतची बैठक अराजकीय होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागांवर आपलं लक्ष केंद्रित करेल. मुरलीधर जाधव यांनी किमान माझी पत्रकार परिषद पाहायला हवी होती. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांची काय नाराजी आहे हे मला माहिती नाही. कदाचित शिवसेना पक्षातील हा अंतर्गत प्रश्न असू शकतो. दोन्ही आघाड्यांमध्ये साखर कारखानदार खचाखच भरले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अपक्ष लढली आणि जिंकली तशीच निवडणूक यावेळी लढली जाईल, असे त्यांनी सांगितले
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री भेटीवर राजू शेट्टी काय म्हणाले?
|