विशेष बातम्या
सतेज पाटलांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले..?
By nisha patil - 3/3/2025 2:41:56 PM
Share This News:
सतेज पाटलांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले..?
अभ्यंग स्नानासाठी शहरवासीयांच्या किती दिवाळी खर्ची
आमदार राजेश क्षीरसागर यांचा सवाल...
जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेवून जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे.
थेट पाईपलाईनमधून अभ्यंगस्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासीयांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या. त्यानंतर स्वत: आंघोळ करून गळकी थेट पाईपलाईन योजना शहरवासीयांच्या माथी मारली, याकडे लक्ष द्यावे, असा उपहासात्मक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला.आमदार सतेज पाटील यांच्याकडे मंत्री पद, पालकमंत्री पद होते. महापालिकेत त्यांची सत्ता होती पण त्यांनी शहरासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला
सतेज पाटलांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले..?
|