बातम्या

आज सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं?

What happened in the all party meeting today


By nisha patil - 1/11/2023 4:28:19 PM
Share This News:



राज्यात मराठा आंदोलनाचा वणवा पेटला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणावर  मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सर्वपक्षीय   बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय बैठकित विविध पक्षांचे नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाद्वारे आमदारांच्या घरांवर होणारे हल्ले, खासगी आणि सरकारी मालमत्तांचे होणारे नुकसान, शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण यावर सर्वांनीच बैठकीत चिंता व्यक्त केली आहे.
     मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असा  सर्वपक्षीय बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला  तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते  मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन ही या बैठकीत  करण्यात आले.


आज सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं?