बातम्या
आयुर्वेदिक अभ्यंग म्हणजे काय? त्याचे फायदे काय ?
By nisha patil - 7/23/2023 7:38:38 AM
Share This News:
आयुर्वेदिक अभ्यंग म्हणजे काय?
अभ्यंग म्हणजे डोक्यापासून ते खाली पायाच्या अंगठ्या पर्यंत कोमट आयुर्वेदिक औषधी तेलाने केलेली अभ्यंग विधी,.प्रयत्न हा असतो की या दरम्यान औषधी तेल पुर्णपणे शरीरात मुरल जावं आणि तसेच या आयुर्वेदिक अभ्यंग द्वारे शरीरात एक ऊर्जा निर्माण व्हावी हा उद्देश असतो.यात शरीराची समोरची बाजू , डावी बाजू, उजवी बाजू ,पाठीवर आणि बसलेल्या स्तिथीत डोक्या पासून तर पाया पर्यंत प्रत्येक स्तिथी बदलत बदलत अभ्यंग विधीकेला जातो.
हा मसाज नियमित केल्याने शरीर आणि मन दोन्ही कायम ऊर्जावन राहतात. त्यात संतुलन साधलं जात.
ज्या स्रियां निरोगी असतील ,कोणत्या ही व्याधी नसतील त्या घरीच कोमट औषधी तेलाने नियमित अभ्यंग करू शकतात. आजारी माणसासाठी तेलाने अभ्यंग करणे फायद्याचे असते.
आयुर्वेदिक अभ्यंग म्हणजे काय? त्याचे फायदे काय ?
|