बातम्या

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा काय..?

What is Prakash Ambedkar's big announcement


By nisha patil - 3/27/2024 6:27:05 PM
Share This News:



मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येणार का? यासाठी चर्चा सुरु होत्या. प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकांना हजेरी लावत होते. अखेर या प्रश्नाच आज उत्तर मिळालं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. इतकच नाही, प्रकाश आंबडेकर यांनी काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी त्यांनी काही जागांची मागणी केली होती. पण मविआकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे

 अखेर प्रकाश आंबेडकर यांनी आपला एकला चलो रे चा मार्ग पत्करला आहे.
   प्रकाश आंबडेकर यांची ही भूमिका म्हणजे महाविकास आघाडीसाठी एक झटका आहे. कारण वंचितची राज्यामध्ये संघटनात्मक ताकद आहे. त्यांची काही लाख मत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर प्रभावी ठरत असल्याच दिसून आलं होतं. त्यामुळे वंचितची एकगठ्ठा मत मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु होता.आता काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला ही मत मिळणार नाहीत. अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला होईल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर स्वत:चे उमेदवार निवडून आणू शकत नसले, तरी मविआचे काही उमेदवार त्यांच्यामुळे नक्कीच पडू शकतात.


प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा काय..?