बातम्या

सांताक्लॉज म्हणजे काय?

What is Santa Claus


By nisha patil - 12/25/2023 7:21:30 AM
Share This News:



सांताक्लॉज म्हणजे काय?
सांता क्लॉजाचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. सांता क्लोज आणि नाताळ सण यांचे नाते अगदी घट्ट आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या अगोदर म्हणजे 24 डिसेंबर या दिवशी रात्री खेळणी आणि इतर भेटवस्तू वाटत असतो, असे मानले जाते.

जगभरात या सांता क्लॉज ची एक वेगळीच ओळख आहे. प्रत्येक लहान मुले हे सांता क्लॉजला पसंद करतात. युरोपात आणि भारतातही ख्रिसमस सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात.


इसवी सनाच्या चौथ्या शतकातील ग्रीक ख्रिस्ती बिशप सेंट निकोलस हे मायरा या ठिकाणी राहत होते. हे नेहमी गरिबांना भेटवस्तू वाटायचे. त्यामुळे ते ख्रिस्ती धर्मात विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी आयुष्यभर ख्रिस्ताची सेवा केली.

त्यांच्या मृत्युनंतर मध्ययुगात त्यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा नंतरच्या काळातही चालू राहिली. फरक इतकाच की संत निकोलसच्या नावाऐवजी सांता क्लॉज असे नाव पडले.

इसवी सन सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये नाताळबाबा या नावाने ही संकल्पना सुरू राहिली. त्यामुळे सांता क्लॉज ख्रिस्ती धर्मात लोकप्रिय झाला. सांता क्लॉज वर अनेक लेखकांनी कथा रचून, अनेक चित्रपट आणि मालिका तयार केल्या आहेत.


सांताक्लॉज म्हणजे काय?