बातम्या

माणसं जोडणं म्हणजे काय ? ...

What is connecting people


By nisha patil - 3/25/2024 7:21:52 AM
Share This News:



 माणसं जोडणं म्हणजे, समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं. आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं... माणसं जोडणं म्हणजे, ऐकण्याची कला शिकणं.  फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं... माणसं जोडणं म्हणजे, माणसांवर "शिक्के" न मारणं.  समोरचा अधिक महत्त्वाचा -  हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं... माणसं जोडणं म्हणजे,  कौतुकाची एकही संधी न सोडणं,  तक्रार मात्र जपून करणं... माणसं जोडणं म्हणजे,  प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं. रागाचंही रुपांतर प्रेमात करता येणं... माणसं जोडणं म्हणजे, इतरांना माफ करता करता  स्वतःच मन साफ करणं... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, माणसं जोडणं म्हणजे, इतरांमधला "भगवंत " पाहत पाहत स्वतःमधला "भगवंत" प्रकट करणं..! !


माणसं जोडणं म्हणजे काय ? ...