बातम्या
शिरढोण ग्रामपंचायतीच्या अभ्यास दौऱ्याचा गावाला फायदा काय दौऱ्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी
By nisha patil - 9/1/2024 12:43:38 PM
Share This News:
शिरढोण ग्रामपंचायतीच्या अभ्यास दौऱ्याचा गावाला फायदा काय दौऱ्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी
शिरढोण(संजय गायकवाड)/ता.९ शिरढोण (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून विकास पाहणी दौरा या नावाखाली वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला,पाटोदा, व बारामती या तीन ठिकाणी गेल्या तीन वर्षात सहल जाऊन आली. सहल जाऊन आल्यानंतर ग्रामस्थांना काहीच उपयोग झाला नाही.गावाला फायदा होत नसेल तर सहल आयोजित करण्याचे कारण काय? अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी थांबून अशा प्रकारच्या सहली रद्द करून सदरचा निधी प्राथमिक शाळेला संगणक देण्यासाठी करावा अशी मागणी ग्रामस्थातून करण्यात येत आहे
ग्रामपंचायतीच्या विकास पाहणी दौऱ्याच्या नावाखाली निघणारी सहल जणू मौजमजा होत आहे.या दौऱ्याचा अभ्यास करून गावचा कायापालट करण्याचा सहलीच्या आयोजनामागे मुख्य उद्देश असतो. त्यासाठी कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील अभ्यासू लोकांचा यात समावेश करणे बंधनकारक आहे.
शिरढोण ग्रामपंचायतीने वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र यासाठी ८४हजार, पाटोदा हिवरे बाजार यासाठी ७४ हजार आणि शेतकरी सहल बारामती साठी ७९ हजार रूपये अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली खर्च केले आहेत. या तीन ठिकाणी अभ्यास दौरा करून आल्यानंतर आज पर्यंत कोणीही अभ्यास दौराबद्दल ग्रामस्थांना माहिती दिली नाही जर गावच्या विकासाला त्याचा फायदा होत नसेल तर सहल काढून उपयोग काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. त्यामुळे सहल ही योजनाच बंद करून प्राथमिक शाळेसाठी संगणक खरेदी करीता निधी वाढवून देण्याची मागणी शिक्षण प्रेमीतून व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील लोकांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्या माहितीचा उपयोग गावच्या विकासासाठी होऊन गाव समृद्ध होईल या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारकडून ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून लाखो रुपयाचा निधी मिळू लागला आहे. आणि या निधीतूनचं सहलीचे आयोजन केले जाते.सहलीला जाऊन आलेल्या लाभार्थीने स्वतःसह गावच्या विकासाला चालना मिळेल हा उद्देश शासनाचा आहे. पण अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मौज मजा सहल काढली जाते. त्याचा गावाला फायदा नाही त्यामुळे सहल विषयावर गाव सभा वादळी होत आहेत.
तीन ठिकाणी सहल जाऊन आली तरी त्याचा गावाला फायदा झाला नसताना पुन्हा पुणे, अहमदनगर या ठिकाणीं २लाख रूपये खर्चाची सहल आयोजित करून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आले आहे.सहल रद्द करून हाच निधी प्राथमिक शाळेच्या मुलांना संगणक उपलब्ध करून दिल्यास मुलांचा पाया मजबूत होऊन समाजामध्ये ग्रामपंचायती विषयी चांगला संदेश जाईल यात तीळ माञ शंका
प्रतिक्रिया आज पर्यंत अभ्यास दौऱ्याचा गावाला फायदा झाला नाही. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मौजमजा करत शासनाच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. सध्या २लाख रुपये खर्चाच्या सहलीची वर्क ऑर्डर देण्यात आली असून ही सहल रद्द करून सदरचा निधी संगणक खरेदीसाठी प्राथमिक शाळेला द्यावा अन्यथा सहल गेल्यास ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांना घेऊन आमरण उपोषण करणार
विश्वास बालीघाटे सामाजिक कार्यकर्ते
शिरढोण ग्रामपंचायतीच्या अभ्यास दौऱ्याचा गावाला फायदा काय दौऱ्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी
|