बातम्या
नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय?
By nisha patil - 10/4/2024 12:48:46 PM
Share This News:
मुंबई : प्रतिनिधी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपाला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांची राज ठाकरेंच्या निर्णयावर टीका.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपाला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. भाजपाने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी महाविकास आघाडीमधील पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांची कोणती फाईल उघडली, ज्यामुळे त्यांच्या नवनिर्माण पक्षाचे नमोनिर्माण झाले, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय?
|