बातम्या
गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
By nisha patil - 6/22/2023 8:30:26 AM
Share This News:
सध्या थंडीचा मौसम सुरू झाला त्यामुळे सर्वचजण आपापल्या घरी गरम पाणी करून पित असतीलच त्यातून काहींना गरम पाणी प्यायलाही फारसे आवडत नाही त्यामुळे ते कोमट नाहीतर नॉर्मल तापमानावरील पाणी पितात.
पण अनेकदा असं होतं की, थंडी आहे म्हणून अनेकजणं मधून मधून कधीही गरम पाणी पितात आणि साधं पाणीही तहान लागली म्हणून पित असतात. पण तुम्हाला माहितीये का की, थंड आणि गरम पाणी पिण्याची योग्य वेळ काय आहे तुम्हाला माहितीये का? पाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी आहेतच. त्यातून गरम पाण्याचेही अनेक फायदे आहेत परंतु अनेकांना हे माहिती नसते की, गरम आणि थंड पाणी पिण्याचे योग्य फायदे काय आहेत आणि पिण्याची योग्य वेळ कोणती आहे?
असं म्हटलं जातं की खोलीच्या तापमानपेक्षा जास्त किंवा कमी असलेले पाणी हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पाण्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आयुर्वेदातही पाण्याला जीवन म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या शरीरासाठीही पाण्याचे सेवन हे खूप महत्त्वाचे आहे. पचनशक्ती, हायड्रेशन, ब्लड प्रेशर, वजन आणि शरीरातील उर्जा यांसाठी पाणी हे प्रचंड महत्त्वाचे आहे. पाण्यानं आपली तहान तर भागतेच परंतु त्यातून पाणी हे गरम आणि नॉर्मल हे कधी प्यावे हेही जाणून घेणे म्हत्त्वाचे ठरेल.
कधी प्यावे गरम पाणी?
तुमची पचनक्रिया बिघडली आहे असे वाटतं असेल तर तुम्ही गरम पाणी प्या. तुम्हाला जर का भुक कमी लागत असेल तरीही तुम्हाला गरम पाणी पिणं फायदेशीर ठरेल. तुम्हाला घशात खवखव किंवा खोकला झाला असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात म्हणजे अधून-मधून गरम पाणी प्या. तुम्हाला ताप आला असेल तरीही तुम्हाला गरम पाणी पिणं बंधनकारक आहे. सर्दीतही तुम्हाला गरम पाणी पिण्यासाठी पर्याय नाही त्याचसोबत पोट फुटलं असं किंवा जास्त पोटदुखी होत असेल तर तुम्ही गरम पाणी प्या.
कधी प्यावे नॉर्मल तापमानातील पाणी?
आपल्याला साधं पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्यालाही हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल की आपण हे पाणी कधी प्यायला हवे. त्याची योग्य वेळ कोणती? जर तुम्हाला खूप तहान लागली असेल तरच नॉर्मल तापमानतील पाणी प्यावे. तुम्हाला फूड पॉईझनिंग झाले असेल तर तुम्ही साधं पाणी प्या त्यानंतर कोणाला ब्लिंडींग डिसोर्डर असतील तर त्यांनीही साधं पाणी प्यायला हवं. जर तुम्ही फारसं दमला असाल आणि जर का तुम्हाला थकल्यासारखे वाटतं असेल तर तुम्ही साधं पाणी प्या. दारूचे सेवन केल्यानंतरही तुम्ही साधं पाणी पिऊ शकता.
गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
|