बातम्या

राज्यात यांची काय औकात? बाहेरच्या लोकांना काय माहित? - संजय राऊत

What is their status in the state


By nisha patil - 11/24/2023 5:11:30 PM
Share This News:



राजस्थानमधील शिंदे गटाचे हिंदुहृदयसम्राट बॅनर्सवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी  संतापजनक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले  शिंदे गट, अजित पवार गट भाजपात विलीन होणार आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असा दावा ठाकरे गटाचे नेते  खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट बोलण्याची नवी परंपरा सुरु झाली आहे. राज्यात यांची औकात काय ? बाहेरच्या लोकांना काय माहित? शिंदेनी नेमकं काय काम केलं हिंदूत्वासाठी? असा सवाल संजय राऊत यांनी  शिंदे गटाला विचारला. आपल्या देशात  “दोनच हिंदुहृदयसम्राट आहेत  एक सावरकर आणि  दुसरे बाळासाहेब ठाकरे, लोकांनी त्यांनाच  हिंदुहृदयसम्राट  मानलं आहे” 
      “हे पनवती लोक. भाजपा हरणार. 2014 पासून देशाला पनवती लागलीय. भाजपाला काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, पण ते झालं नाही. शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा  ते पण झालं नाही” तसेच  “दहशतवादमुक्त काश्मीर झाला नाही. जवान शहीद होतात. त्यांच्य हत्या होत आहेत. पण त्या बद्दल मोदी आणि शाह यांनी शोक हि व्यक्त केला नाही. त्यांचं सर्व लक्ष निवडणूक प्रचाराकडे आहे” असं टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपवर लगावला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


राज्यात यांची काय औकात? बाहेरच्या लोकांना काय माहित? - संजय राऊत