बातम्या
सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय केलं पाहिजे आणि काय नाही? जाणून घ्या!
By nisha patil - 12/12/2023 7:31:41 AM
Share This News:
सकाळी उठल्यानंतर काही आरोग्यदायी गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहतं आणि आपल्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होते. त्यामुळे प्रत्येकाची सकाळची दिनचर्या सर्वोत्तम असावी. असे म्हटले जाते की, दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टींनी केली तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.
त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सकाळची सुरुवात ही चांगल्या आरोग्यदायी गोष्टींनी करावी. मग व्यायाम असो सकाळचा आहार असो किंवा सकाळच्या काही गोष्टी असो अशा प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यात बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफी पिऊन करतात. पण ते त्यांच्या शरीरासाठी घातक ठरते.
सकाळं ताजं उण घ्या – प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर सकाळचं ताज कोवळं उण घेणं खूप गरजेचं असतं. ताज्या उन्हात बसल्यामुळे आपल्या शरीरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते तसेच विटामिन डी देखील आपल्या शरीराला मिळते. ताजं उण घेतल्यामुळे आपलं मन देखील शांत राहते तसेच आपल्या शरीरातील हाडे देखील मजबूत होतात. त्यामुळे प्रत्येकाने उणं घेणं गरजेचं असतं.
गरम पाणी प्या – सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. गरम पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते. गरम पाणी पिल्यामुळे आपली पाचन क्रिया सुधारते. तसंच आपले शरीर फिट आणि हेल्दी राहण्यास मदत होते.
काहीना काही वाचा – प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर काहीना काही वाचणं खूप गरजेचं असतं. मग पुस्तके असो, मॅक्झिन असो किंवा वर्तमानपत्र असो प्रत्येकाने काही ना काही वाचणं खूप गरजेचं असतं. सकाळी पुस्तक वाचल्यामुळे आपल्या मनात सकारात्मकता निर्माण होते.
बॉडी स्ट्रेचिंग करा – सकाळी उठल्यानंतर आपले शरीर खूप आळसलेले असते, थोडा थकवा देखील असतो. त्यामुळे आपल्या शरीरातील थकवा, आळस दूर करण्यासाठी प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग करणं गरजेचं असतं. बॉडी स्ट्रेचिंग केल्यामुळे आपलं शरीर फ्लेक्झिबल होते तसेच ताण-तणाव देखील कमी होण्यास मदत होते आणि आपली हाडे देखील मजबूत होतात.
मेडिटेशन करा – प्रत्येकाला डॉक्टर नेहमी मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं. मेडिटेशन केल्यामुळे आपला ताणतणाव दूर होतो. तसेच मनात सकारात्मकता निर्माण होते. सोबतच सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन केल्यामुळे आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.
सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय केलं पाहिजे आणि काय नाही? जाणून घ्या!
|