बातम्या
निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय करायला पाहिजे?
By nisha patil - 2/19/2024 7:27:54 AM
Share This News:
शिस्तबद्ध, नियमितता जीवनात आणली तर निरोगी आयुष्य जगायला मदत होईल.
जीभ ही सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे तिच्यावर ज्याचे नियंत्रण असेल तोच सर्वार्थाने श्रेष्ठ असेल. निसर्ग नियम पाळून भौतिक साधनांची योग्य निवड करून आयुष्याला आकार देण्यासाठी आपणच जबाबदार आहोत तसेच आयुष्य बरबाद करण्यासाठी आपणच निमित्त असतो. आपणच आपले मित्र आणि शत्रु असतो.
अन्न, वस्त्र, निवारा याबाबतीत चौकस असले पाहिजे. अन्न हे निव्वळ पोट भरण्यासाठी नसुन, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे .मागाहून डायट चे फॅड पाठीमागे लावायचे हे काही पटत नाही.चौरस आहार, विहार, व्यायाम करून दैनंदिन जीवन परिपूर्ण केले पाहिजे. शरीरा बरोबर मन प्रसन्न होईल असे जीवन व्यतीत केले पाहिजे. निव्वळ शरीराची काळजी घेऊन आयुष्य निरोगी जगता येत नाही.मनातील विषयांचे चिंतन करून सुदृढ शरीराचा पाया रचला जाणार नाही.सुदृढ मन आणि शरीर एकमेकांच्या हातात हात घालून खेळीमेळीने चालले पाहिजे.
व्यसनमुक्त जीवनात आनंद मिळेल तोच खरा आनंद असतो. इतर लोक ज्याला आनंद, सुख ,समाधान मानतात आणि आयुष्याची होळी करतात ते सुख नाही. संध्याकाळ ही घरात,कुटुंबात घालविली पाहिजे, हॉटेल मध्ये नाही.
शुध्द हवा,शुध्द पाणी आरोग्यासाठी आवश्यक असून त्यासाठी सकाळ, संध्याकाळ निसर्गरम्य परिसरात फिरले पाहिजे. पाणी फिल्टर करून, तापवलेले असले पाहिजे.
कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी आपली धर्मपत्नी हीच खरी सहचारिणी असते. निरोगी काम जीवन हे सुद्धा निरोगी आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
आयुष्यात पैशाला महत्व आहे. जगण्यासाठी आवश्यक असून त्यावर योग्य नियोजन केल्यास वर्तमान व भविष्यकाल सुखात जाईल याची तरतूद केली पाहिजे.
विश्वास हा निरोगी श्वासाप्रमाणे आयुष्यात असला तर जीवन आणखीनच छान, सुंदर रुप धारण करून आनंद देत असतो. आपल्या आत असलेल्या परमात्म्याशी आपण सुसंवाद साधून आपल्या आयुष्याचे कल्याण केले पाहिजे.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय करायला पाहिजे?
|