बातम्या

माणसाने कशासाठी जगावे आणि कशाप्रकारे जगावे?

What should man live for and how should he live


By nisha patil - 2/19/2024 7:26:59 AM
Share This News:



पाण्याचा प्रवाह कशासाठी वाहतो किंवा नदी कशासाठी वाहते.तर लोक म्हणतात समुद्राला मिळण्यासाठी वाहते.म्हणजे ते तिचे डेस्टिनेशन आहे.माणूस कशासाठी जगतो तर मरण्यासाठी असे म्हटल्यावर नकारात्मक भूमिका मांडली जाईल.कुठलाही विचार,संदेश हा नकारात्मक नसावा.त्यात काहीतरी चांगलं असाव.

निसर्ग चक्र सतत न थकता अव्याहत पणें लाखो वर्षे चालू आहे.जीवसृष्टी अस्तित्वात आल्यापासून चालू आहे.खंड कुठेही नाही. थांबला तो संपला. बुध्दी नसलेले पशु पक्षी मजेत उजाडल्या पासून हिंडत फिरत असतात.तर मानवाने काय करावे हा प्रश्नच होवू शकत नाही.स्वतः साठी नाही तर दुसऱ्यासाठी जगावे.जन्म किती याचा विचार न करता हाच शेवटचा म्हणून जोमाने काम करावे आनंदी राहावे.जे मनाला येईल ते दुसऱ्याला दुःख न देता करत राहावे. गात राहावे ,हसत राहावे ,बोलत राहावे,आणि सगळ्या जगाला हसाय ला बोलाय ला बागडायला शिकवावे.मृत्यू म्हणजे दुःख त्याच्या साठी आपण जन्माला आलो आहोत हा विचारच चुकीचा आहे.एखादा सैनिक किती आनंदाने देशासाठी लढतो.तो काय मरण्यासाठी लढतो? आपल्याला तर आपल्या कुटुंबात, देशात ,समाजात राहायचे आहे.मजेत रहा.

जन्म मृत्यू च्या मध्ये जीवन असते.ते जगताना काही उद्दिष्टे असावीत.समाजासाठी नाही करू शकलो तरी एक माणूस म्हणून चांगलं जीवन जगणे आपल्या हातात आहे..सुखा समाधानाने झोप यावी म्हणून दिवसा सूर्यप्रकाशात चांगली कृत्ये घडावित म्हणून उपास ना करावी.संत ऋषी मुनी यांनी आपल्याला वारस म्हणून नेमले आहे असे समजावे.ज्ञानेश्वरांचे पसायदान हेच शिकवते. आयुष्य किती जगलात पेक्षा कसे जगळात हेचं महत्वाचे आहे.


माणसाने कशासाठी जगावे आणि कशाप्रकारे जगावे?