बातम्या
सकाळी झोपेतून उठून सगळ्यात आधी काय प्यावं?
By nisha patil - 5/9/2023 7:45:03 AM
Share This News:
जीवन चांगलं जगायचं असेल तर निरोगी राहणं फार महत्वाचं आहे. जर शरीर निरोगी नसेल तर जगातला कोणताही आनंद तुम्ही घेऊ शकत नाही. आपलं शरीर किती फीट रहावं हे आपल्या सकाळच्या सवयींवर अवलंबून असतं.
बरेच लोक सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पिणं पसंत करतात. पण ही सवय चुकीची आहे. असं केल्याने पोटात गॅस तयार होतो आणि शरीर डिहायड्रेट होतं. हेच कारण आहे की, डॉक्टर सकाळी उठून सगळ्यात आधी पाणी पिण्याचा सल्ला देतात.
सकाळी पाणी पिण्याचे फायदे
सकाळी किती पाणी प्यावं?
डॉक्टरांनुसार, सकाळी किती पाणी प्यावं हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या गरजेवर अवलंबून असतं. याला कोणत्याही फॉर्म्युल्यात बांधता येत नाही. जर तुमच्या शरीराची गरज एक ग्लास पाण्याने पूर्ण होत असेल तर जबरदस्ती 2 किंवा 3 ग्लास पाणी पिणं चुकीचं ठरेल. पाण्याने आपल्या शरीरातील वात शांत ठेवून पोटाची समस्या दूर होते.
कशात ठेवलेलं पाणी प्यावं?
हेल्थ एक्सपर्टनुसार मडक्यात ठेवलेलं पाणी सगळ्यांचं मानलं जातं. यातील पाणी सगळ्यात ऋतुंमध्ये एकसारखं राहतं. तुम्ही चांदी किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणीही पिऊ शकता. तांब्याच्या भांड्यातील पाण्यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. पण बीपीच्या रूग्णांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. याने समस्या वाढू शकते.
वातावरणाचाही विचार करा
सकाळी उठून पाणी पिताना वातावरणाचाही विचार करावा. हिवाळ्यात पाणी थोडं कोमट करून प्यायला हवं. याने घसा आणि पोट चांगलं राहतं. तेच उन्हाळ्यात मडक्यातील पाणी आणि रूमच्या तापमानातील पाणी दोन्ही चांगलं राहतं.
लिव्हरच्या रूग्णांनी सकाळी काय करावं?
ज्या लोकांना लिव्हरची समस्या असेल त्यांनी सकाळी उठून पाणी कोमट करून प्यावं. त्यानंतर एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद मिक्स करून प्यावं. याने लिव्हरची समस्या हळूहळू दूर होते.
सकाळी झोपेतून उठून सगळ्यात आधी काय प्यावं?
|