बातम्या

कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे ? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

What to do to escape from the scorching sun


By nisha patil - 8/24/2023 7:24:54 AM
Share This News:



उत्तर भारतात पडणार्‍या उष्णतेमुळे सर्वांचे जगणे कठीण झाले आहे. घरातून बाहेर पडताच कडक उन्हात घाम फुटतो. यामुळे आजारी देखील पडू शकता. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उन्हापासून दूर राहू शकता. उन्हाळ्यात स्वत:चे संरक्षण कसे करावे ते जाणून घेवूया. 1. तोंड आणि डोके 

2. जास्त पाणी पित रहा
याशिवाय उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून वेळोवेळी पाणी पीत रहा. बहुतेक लोक उन्हाळ्यात पाणी पितात, परंतु तरीही त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

 

3. सुती आणि आरामदायक कपडे घाला 
उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत, कारण असे न केल्यास तुम्हाला खूप उष्णता जाणवेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल.

 

4. उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा 
तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा सनस्क्रीन लोशन लावा, जेणेकरून तुमची त्वचा कडक सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहील. यामुळे तुमची त्वचा काळी पडणार नाही आणि टॅनिंगही होणार नाही. 

 

5. फळांचा ज्यूस पीत रहा
फळांचा ज्यूस जास्त प्या. ज्यूस प्यायल्याने पोषक तत्वे मिळतात. यामुळे शरीर ताजेतवाने वाटते.
उन्हाळ्यात फळांचा रस प्यायल्याने जास्त फायदा होतो. कारण काही फळे थंड असतात, ज्यामुळे शरीर थंड राहते.उन्हापासून ठेवा सुरक्षित 
घराबाहेर पडताना तोंड आणि डोके सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले पाहिजे. कारण जेव्हा सूर्यप्रकाश तुमच्या तोंडावर आणि डोक्यावर पडतो तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुमचा चेहरा काळवंडू शकतो, टॅनिंग होऊ शकते. दुसरीकडे सूर्यप्रकाश डोक्यावर पडल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.


कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे ? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी