बातम्या

सतत उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी काय करावे?

What to do to stay energetic and happy all the time


By nisha patil - 2/19/2024 7:25:57 AM
Share This News:



आपण सर्वसाधारण मनुष्य आहोत. भाव, भावना, राग, लोभ यांच्या आहारी जातोच. त्यामुळे कायम आनंदी आणि उत्साही राहू अशी अपेक्षा ठेवू नका.
जास्तीत जास्त आनंदी रहायच असेल तर देव, धर्म, राजकारण, इतिहास ईत्यादी गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका.

अध्यात्म झेपत नसेल तर वाचू नका. अशी पुस्तक वाचून डीप्रेशनमध्ये गेलेली काही उदाहरण मला माहीती आहेत. आमचे एक मित्र अशी पुस्तक वाचून जीवनाचा अर्थ वगैरे शोधायच्या भानगडीत सुसायडल झाले होते. तर अशा पुस्तकांपासून लांब रहा.

दुसर्‍याच नुकसान न होता फावल्या वेळात तुम्हाला जी गोष्ट आनंद देते असा छंद जोपासा.

चांगली मिश्किल, विनोदी पुस्तक वाचा. उगाचच आपण कशासाठी जन्मलो, आयुष्याचा अर्थ काय वगैरे फालतू प्रश्नांची उत्तर शोधू नका. तरीही अध्यात्मिक पुस्तक वाचायचच असेल तर हे सगळ्यात उत्तम अध्यात्मिक पुस्तक आहे.सर्वसाधारण व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्याच वर्णन वाचून आयुष्याचा अर्थ सहज कळेल. उगाचच ते आत्मा, परमात्मा, अंतर्मन वगैरे क्लिष्ट संकल्पना वाचायची गरज नाही.

आवडीच्या लोकांच्या संपर्कात रहा. चांगले चित्रपट बघा. माझ्यासाठी चित्रपट बघणे हा चांगला स्ट्रेसबस्टर आहे.

जवळच्या बागेत फेरफटका मारा. घरी, आजूबाजूला लहान मुल असतील त्यांच्याबरोबर खेळा. काॅलेजच्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात रहा… त्यांच्या बरोबर फालतू गप्पा मारा.

आयुष्य जास्त गंभीरपणे घेऊ नका… दुसर्‍यांबरोबर स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका… छोट्या छोट्या गोष्टीतना आयुष्याचा आनंद लुटा. रडण्यासाठी लाखो कारण आहेत, हसण्यासाठी अर्ध कारण मिळाल तर त्यात खुश व्हा… २४ तासातली ५ मिनीट आनंदात घालवता येत असतील तर त्याची पुरेपूर मजा लुटा.

जस आधी म्हणालो होतो आयुष्य समजण्यासाठी अवजड आणि अवघड अध्यात्मिक पुस्तक वाचायची गरज नाही. तर जाता…जाता… एका विनोदी चित्रपटातून मिळालेला बहुमोल संदेश

सुख, दुःख, राग, लोभ, यश, अपयश ह्याला अवास्तव महत्त्व देऊ नका… आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यच आहे.


सतत उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी काय करावे?