बातम्या
शरद पवार - अदानींच्या भेटीचे नेमकं कारण काय ? या भेटीवर काँग्रेसने काय म्हटलं?
By neeta - 12/29/2023 1:28:21 PM
Share This News:
मुंबई : रात्री उशिरा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गौतम अदानी स्वत: शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी गेले होते. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट का घेतली? या भेटीमागे काय कारण आहे? ते अजून स्पष्ट नाहीय. या भेटीमागे विविध अर्थ लावले जात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती गौतम अदानी हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गौतम अदानी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र काँग्रेस कडून सातत्याने अदानीच्या आणि भाजपच्या नात्या संदर्भात निशाणा साधला जातो ते हिवाळी अधिवेशनात राहुल गांधींनी गौतम अदानी व मोदीवर सोडलेलं टीकास्त्र असो अथवा काँग्रेस नेत्यांनी केलेली हल्लाबोल असो, कायम काँग्रेस च्या नजरा अडणींवर असतात म्हणायला काही हरकत नाही.
शरद पवारांची गौतम अदानींनी घेतली भेट
आता अशातच गौतम अदानींनी यांनी शरद पवारांची भेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी घेतली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात सुद्धा जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अदानी यांनी पहिल्यांदा शरद पवार यांची भेट घेतलेली नाही. यापूर्वी सुद्धा गौतम अदानी यांनी शरद पवार आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सध्या देशात एअरपोर्ट बंदरापासून वेगवेगळ्या क्षेत्रात अदानी समूह वेगाने विस्तारत आहे. गौतम अदानी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. सध्या इंडियात आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अशावेळी अदानी आणि पवारांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पवार - अदानींच्या भेटीवर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. हा विषय आमचा नाही. या संदर्भात पवार साहेबांना विचारलं तर बरे होईल. आम्ही थोडी खिडकीला कान लावून बसलो आहोत” अशी तिखट प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली
शरद पवार - अदानींच्या भेटीचे नेमकं कारण काय ? या भेटीवर काँग्रेसने काय म्हटलं?
|