बातम्या

झेंडावंदननंतर मनोज जरांगेची काय असणार भूमिका, म्हणाले..

What will be Manoj Jaranges role after Zendavandan


By nisha patil - 1/26/2024 7:15:41 PM
Share This News:



मुंबई  : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण  देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगेंच्या  नेतृत्वाखाली निघालेलं भगवे वादळ आता नवीमुंबईत  येऊन ठेपले आहे. सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी सुरु आहे, दुसरीकडे ते उपोषणावर ठाम आहेत. वाशीमध्ये झेंडावंदन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आझाद मैदानात जाणार असल्याचेच मनोज जरागें यांनी सांगितलं की, सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमाला माहिती दिली जाईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, 
   

मनोज जरांगे पाटलांच्या पायाला सूज आल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांना आराम करण्याची गरज असल्याचं बोललं जातंय. मागील काही दिवस पायी दिंडी मुळे जरांगे यांना झोप मिळत नव्हती. मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये निवासासाठी आहेत. तेथील सभेनंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि  मनोज जरांगे यांच्यमध्ये चर्चा  होणार आहे


झेंडावंदननंतर मनोज जरांगेची काय असणार भूमिका, म्हणाले..