बातम्या
महिनाभर चपाती न खाल्लाने काय होईल फायदे की तोटे
By nisha patil - 1/16/2024 7:24:13 AM
Share This News:
महाराष्ट्रीयन लोकांसाठी चपाती म्हणजे एकप्रकारचे अन्न मानले जाते. नाश्ताला चपाती-चहा, दुपारच्या जेवणात चपाती-भाजी, काहीजण रात्रीच्या जेवणात चपाती किंवा भाकरी खातात.
भारतातील प्रत्येक देशात चपाती बनवण्याची पद्धत वेगळी आहे. भारताच्या विविध भागांमध्ये चपात्या खाणारे अनेक लोक आहेत. चपाती खायला सगळ्यांनाच आवडते. चपातीमध्ये शरीराला वेगवेगळी पोषक द्रव्ये पुरवण्याची क्षमता असते आणि म्हणूनच अनेकदा ग्रामीण भागात तसेच शहरी भागात लोक वेगवेगळ्या पदार्थांसह चपात्या खातात.
शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे चपातीत उपलब्ध असतात आणि म्हणूनच चपाती हा मुख्य आहार मानला जातो. अनेक लोकांसाठी चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असेल तर अशा लोकांसाठी चपाती खाणे धोकादायक आहे. ज्या लोकांच्या शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते त्यांनी चपात्या खाणे टाळले आहे. गव्हाच्या चपातीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच आपण दिवसातून अनेक वेळा चपाती खातो. जर या घटकाची मात्रा आपल्या शरीरामध्ये मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास भविष्यात तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
जर महिनाभर चपाती नाही खाल्ली तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गहू हे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवणारे धान्य म्हणून ओळखले जाते. तुमच्या आहारातून गहू काढून टाकल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. तसेच ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या आणि लठ्ठपणा यासारख्या इतर परिस्थितींना प्रतिबंध करण्यास देखील हा प्रयोग मदत करू शकतो.
या गोष्टींचा त्रास होऊ शकतो
गव्हामध्ये सुद्धा कार्ब्स असतात. गव्हाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचन मंदावते, ज्यामुळे गॅस, पोटात गोळा येणे, मळमळ, पोटदुखी, उलट्या आणि पेटके येणे असे त्रास होऊ शकतात. जर कमी प्रमाणात गहू खाल्ले तर पचनप्रक्रिया सुरळीत काम करते. गव्हात फायबर मुबलक प्रमाणात असतं, पचनसंस्था चांगले काम करते. तुमच्या आहारात फायबरयुक्त गहू जोडल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. गहू हा व्हिटॅमिन बी चा स्त्रोत आहे. जो ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि पेशी आणि ऊतींचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक आहे. गहू टाळल्याने बी जीवनसत्वाची कमतरता निर्माण होऊ शकते.
गंभीर आजार होण्याची शक्यता
जर एखाद्या व्यक्तीचे शरीर कोणत्याही प्रकारचे अन्न पचवू शकत असेल तर अशा व्यक्तीने कधीही शिळी चपाती खाणे फायदेशीर ठरते. माणसाची पचनसंस्था कमजोर असते. जर एखाद्या व्यक्तीला अन्न लवकर पचत नसेल तर त्याने रात्रीचे उरलेले अन्न पदार्थ खाऊ नये. ज्यामुळे त्याच्या शरीरात गॅस, अपचन, ऍसिडिटी गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही रिकामे पदार्थ पचले नाही तर तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तुम्हाला गंभीर आजार देखील होऊ शकतात.
महिनाभर चपाती न खाल्लाने काय होईल फायदे की तोटे
|