बातम्या
गुणकारी दूध कधी होऊ शकते हानिकारक ?
By nisha patil - 3/15/2024 7:24:04 AM
Share This News:
रोजच्या जेवणात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणे आरोग्यसाठी फायदेशीर असते असे म्हंटले जाते. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वाना दूध पिण्याचे सल्ले दिले जातात .मात्र तुम्हाला माहित आहे का योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे दूध पिणेच फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया दुधाचे सेवन कधी ठरू शकते घातक.
जेवणानंतर दूध पिण्याचे टाळा. दुध हा पदार्थ म्हणजे एक परिपूर्ण आहार आहे. त्यामुळे जेवणानंतर लगेचच दूध पिणे म्हणजे पुन्हा एकदा जेवण्यासारखे असते. दूध हे पचायला जड असते त्यामुळे जेवणानंतर लगेचच दूध पिल्याने जडपणा जाणवतो. तसेच पचनक्रिया मंदावते.
दूध पिण्यापुर्वी आंबट पदार्थ जसे की लिंबू, लोणचे ,चटणी अशा पदार्थांचे सेवन करू नका. तसेच मसालेदार आणि चटपटीत पदार्थ देखील खाऊ नयेत. असे पदार्थ खाऊन दूध खाल्यामुळे पोटात गडबड होऊ शकते. त्यामुळे पोटात गॅस, ऍसिडिटी , पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.तसेच मासे खाल्यानंतर जर दुधाचे सेवन केले गेले तर त्वचेवर पांढरेडाग पडु शकतात. माशांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जस्त असते. दूध आणि मासे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटींचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे पचन होण्यासाठी आतड्यांना अधिक श्रम घ्यावे लागतात. त्यामुळे त्वचा रोग होण्याची संभावना असते..
गुणकारी दूध कधी होऊ शकते हानिकारक ?
|