बातम्या

मलायकासोबत अजून कपूर लग्न कधी करणार?

When will Kapoor marry Malaika again


By nisha patil - 12/14/2023 3:28:29 PM
Share This News:



 करण जोहरचा 'कॉफी विथ करण 8' हा लोकप्रिय टॉक शो आहे. या कार्यक्रमात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. यावेळी  'कॉफी विथ करण 8 मध्ये अजुरन कपूरने  आदित्य रॉय कपूर सोबत  हजेरी लावली.  या कार्यक्रमात करण जोहरने  अर्जुन कपूरला मलायका अरोरासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यावर  अर्जुन हे अनफेअर असल्याचं म्हणाला आहे. 
  करण जोहरने अर्जुनला विचारलं मलायकासोबतचं तुझं नातं पुढे घेऊन जाण्याचा काही विचार करतो आहेस का? यावर उत्तर देत अर्जुन म्हणाला,"आयुष्याच्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलण्याचा हा योग्य मंच नाही. निर्णय होईल तेव्हा आम्ही दोघेही यासंदर्भात तुम्हाला माहिती देऊ. सध्या मी खूप आनंदात आहे. आमच्या नात्याबद्दल मी एकटं काही बोलू शकत नाही. मला वाटतं रिलेशनबद्दल एकट्याने भाष्य करणं हे त्या नात्यासाठी चुकीचं आहे. 
   

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. . पण मलायकाच्या वाढदिवसाला तिच्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत अर्जुनने या सर्वांना पूर्णविराम दिला. आता अर्जुन आणि मला एक असं लग्न कधी होणार यासाठी चहा ते आतुरतेने वाट पाहत आहेत...


मलायकासोबत अजून कपूर लग्न कधी करणार?