बातम्या

सकाळी उठल्यावर बेडवरच करा 4 योगासने, झटक्यात कमी होईल चरबी

When you wake up in the morning


By nisha patil - 4/12/2023 9:37:33 AM
Share This News:



सध्याच्या काळात बहुतेक लोकांचं काम हे डेस्कवर बसून असतं. मग ऑफिसमध्ये सतत एकाच जागी बसून लोक काम करताना दिसतात. त्यात आजकालचे लोक फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. तर एकाच जागी बसून काम करणं, फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाणं अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.

लोकांच्या शरीरातील चरबी वाढते, पोट सुटायला लागतं. त्यामुळे लठ्ठपणाचा सामना लोकांना करावा लागतो.

लोकं वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. मग जिमला जाणं, डाएट करणं अशा अनेक गोष्टी करत असतात. पण त्यांना दररोजच्या कामामुळे या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. तर आता आपण एका अशा उपायाबाबत जाणून घेणार आहोत ज्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही.

नौकासन – तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंथरूणातच नौकसन करू शकता. यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. नौकासन करण्यासाठी तुमचे हात शरीराजवळ ठेवा आणि एक दीर्घ श्वास घ्या. तुम्हा श्वास सोडताना तुमची छाती आणि पाय जमिनीवरून उचला. नंतर तुमचे हात पायांकडे खेचा. या योगासनामुळे चरबी कमी होते, मन शांत राहते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रत्येकानं सकाळी नौकासन करणं गरजेचं आहे.

बटरफ्लाय आसन – बटरफ्लाय आसन हे तुम्ही बसून किंवा झोपून करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या पायाची दोन्ही बोटे जोडून घ्यावी लागतील. नंतर गुडघे वाकवून त्यांना वर आणावे लागेल. तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी बटरफ्लाय आसन करणं गरजेचं आहे.

बद्ध कोनासन – शरीरातील चरबी कमी करण्यासाठी बद्ध कोनासन करणं गरजेचं आहे. हे योगासन केल्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तुमच्या कंबरेभोवती आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी होते. त्यामुळे हे आसन करणं फायदेशीर ठरतं.

परिव्रत सुखासन – हे आसन तुम्ही सकाळी उठल्यानंतर पलंगावर बसून आरामात करू शकता. यासाठी मांडी घालून बसा आणि नंतर तुमची कंबर वळवा. सर्वात आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे. हे आसन दररोज केल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.


सकाळी उठल्यावर बेडवरच करा 4 योगासने, झटक्यात कमी होईल चरबी