बातम्या

कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे

Which vegetables are more healthy


By nisha patil - 2/3/2024 7:30:59 AM
Share This News:



कोणत्या आरोग्य समस्येवर कोणत्या भाज्या गुणकारी आहेत, हे माहिती असल्यास योग्य त्या भाजीचा नियमित आहारात समावेश करणे शक्य होऊ शकते. यासाठी यासंबंधीची माहिती करून घेणे खुप गरजेचे आहे. तसे पाहता सर्वच भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. परंतु, कोणत्या समस्येवर कोणती भाजी जास्त सेवन करावी हे आपण जाणून घेणार आहोत.

भाज्या आणि उपयोग
१ पालकचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते. रक्ताची समस्या दूर होते.

२ मटारमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही.३ कोबीमध्ये कॅल्शिअम असल्याने शरीराची हाडे मजबूत होतात.

४ टोमॅटोच्या सेवनाने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.

५ बीट खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

६ गाजराचे सेवन केल्यास शरीराची ताकद वाढवते. मधुमेहाचा त्रास कमी होतो. चेहऱ्यावर तेज येते. मुरुमेदेखील कमी होतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे