बातम्या

समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील .....

While Samarjit Ghatges meeting was going on Jayant Patil


By nisha patil - 8/23/2024 3:03:37 PM
Share This News:



राजे समरजित सिंह घाटगे यांनी काल भाजपला सोशल मीडियातून हटवल्यानंतर त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. दरम्यान, समरजित सिंह घाटगे एका बाजूला कार्यकर्त्यांचा मेळावा घेत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थेट कागलमध्ये आजच पोहोचणार आहेत. दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा सुद्धा झाली आहे.

त्यामुळे आज दुपारी समरजित सिंह घाटगेआणि जयंत पाटील यांची भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीमध्येच आज कागलच्या हायहोल्टेज लढतीवर शिक्कामोर्तब होणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

दरम्यान, आज मेळाव्याला सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करताना तुतारीवर निवडणूक लढवण्याची घोषणाबाजी केली.


समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील .....