बातम्या

अक्षय कुमारच्या एका हिट चित्रपटासाठी चाहते आसुसलेले असताना एक चांगली बातमी समोर

While fans are dying for a hit movie from Akshay Kuma


By nisha patil - 2/7/2024 7:40:15 PM
Share This News:



 बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार  याचे  चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप होत आहेत. अक्षय कुमार आणि त्याचे चाहते एका हिट चित्रपटासाठी आसुसलेले आहेत. आता अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून प्रेक्षकांना या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.  येत्या 12 जुलै रोजी अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या हिट चित्रपटांचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. 
 

अक्षय कुमारच्या 'सरफिरा' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अक्षयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनेही मोठा विक्रम रचला आहे. 
सरफिरा'ने रचला इतिहास

 

अक्षय कुमारच्या 'सरफिरा' या चित्रपटाचा ट्रेलर 18 जून रोजी लाँच करण्यात आला होता. ट्रेलर रिलीज होऊन 13 दिवस उलटले आहेत. अल्पावधीतच 'सरफिरा'चा ट्रेलर 2024 मधील हिंदी चित्रपटांचा सर्वाधिक पाहिला जाणारा ट्रेलर बनला आहे. या बाबतीत अक्षय कुमारच्या चित्रपटाने शाहिद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या ट्रेलरचा विक्रम मोडला आहे.


अक्षय कुमारच्या एका हिट चित्रपटासाठी चाहते आसुसलेले असताना एक चांगली बातमी समोर