बातम्या
पन्हाळगडाचा खासदार कोण मतदारांचा कौल कोणाला
By nisha patil - 4/22/2024 3:23:10 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी, शहाबाज मुजावर.पन्हाळा गिरीशस्थान नगरपरिषद चे आजी-माजी नगरसेवक 80 टक्के गट-तट एकत्र होऊन मा.माजी आमदार शाहूवाडी पन्हाळा मतदार संघातील सत्यजित उर्फ (आबा ) पाटील यांना पन्हाळा येथील तीन गटांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार. आबा यांना पाठिंबा आज दर्शवला आज नऊच्या दरम्यान सत्यजित आबा हे पन्हाळा हा गडावर आले होते.त्यांचे संपर्क हा प्रत्येक कार्यकर्त्या शी सामान्य माणसांबरोबर त्यांची नाळ जुळली आहे. त्यामुळे आबा हे प्रत्येकांच्या घराघरातून आज पन्हाळा वर फिरत असताना आपल्याला पाहाव्यास मिळाली. सुरुवातीस सादोबा दर्गा व देवी अंबाबाई येथे दर्शन घेऊन मोकाशी गटाचे नेते माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांच्या घरामध्ये सदिच्छा भेट दिली . मोकाशी गटांनी त्यांना बिन शर्त पाठिंबा दिला. त्यानंतर संग्रामसिंह भोसले यांच्या घरात सत्यजित आबा गेले .पन्हाळ्याचे माजी नगरसेवक सतीश भोसले. यांच्या घरात, जनसुराज्य चे कार्यकर्ते नियाज मुल्ला, जावेद मुल्ला , अख्तर मुल्ला, मुनाफ मुजावर, आकीब मोकाशी व मुल्ला गट यांनी सुद्धा पाठिंबा आबांना दर्शवला गडावरचे नगरसेवक,नेते आपला पाठिंबा दर्शनासाठी सतीश भोसले,चेतन भोसले यांच्या घरात आले होते. तसेच रवींद्र तोरसे यांच्या सुद्धा घरात सत्यजित आबा यांनी भेट दिली. त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. चंद्रकांत गवंडी, यांच्या घरात भेट दिली.कुमार गवंडी, प्रकाश गवंडी यांनी सुद्धा आबा यांना पाठिंबा दिला आहे. गडावरचे सर्वच गट-तट एकत्र आल्यामुळे एकतर्फी मतदान आबा यांच्या पारड्यात जाईल असे वातावरण गडावर आहे. तर एकीकडे जनसुराज्य पक्षाचे विजय पाटील, जीवन पाटील, बाळासाहेब भोसले, रवींद्र धडेल अजून यांची भूमी भूमिका कळू शकली नाही. परंतु ज्या ठिकाणी विनय कोरे पाठिंबा देतील त्या ठिकाणी हा गट जाईल असे वातावरण आहे.
तसेच आज दिनांक, १२/०४/२४ आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभा मतदार संघात अपक्ष म्हणून रिंगणात ताराराणी आघाडी कडून उतरले आहेत. विनय कोरे, राहुल आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर तिघांची बंद दाराआड दोन तास चर्चा वारणानगर येथे पार पडली त्यामुळे हातकणंगले खासदारकी मध्ये ट्विस्ट निर्माण झाले आहे.तीन अपक्ष आमदारांनी आज वारणा येथे गुप्त खलबत्ते चालू होते. पन्हाळा मतदार संघ विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची आहे.
गेल्या 2019 च्या लोकसभेच्या वेळी हे गडावरील सर्व गट धैर्यशील माने यांच्या पाठीशी होते. तर या लोकसभे वेळी माने यांच्या विरुद्ध परिस्थिती गडावर झाली आहे .फक्त जनसुराज्य चे काही कट्टर कार्यकर्ते हे विनय कोरे यांच्या मागे आहेत तर बाकीचे सर्व गट सत्यजित आबा यांच्या पाठीशी राहतील आबाच्या बाजूने मतदानाचा कौल आहे.
पन्हाळगडाचा खासदार कोण मतदारांचा कौल कोणाला
|