83 व्या वर्षी बाप होणाऱ्या अभिनेत्याची 29 वर्षाची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?

Who is the 29yearold girlfriend of the actor who became a father at the age of 83


By nisha patil - 1/6/2023 6:49:53 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम हॉलिवूडचा अभिनेता अल पचीनो आणि त्याची  गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह  यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे. नूर ही  प्रेग्नंट  आहे.  द गॉडफादर फेम अभिनेता अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह हिच्याबाबत अनेकांना माहित नसेल.
नूर ही एप्रिल 2022 पासून अल पचीनोला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. अल पचीनो आणि नूर ही जोडी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये व्हेनिसमधील फेलिक्स ट्रॅटोरिया येथे स्पॉट झाली होती, तेव्हा ते इटालियन हॉटेलमध्ये जेवल्यानंतर एकाच कारमधून निघताना दिसले होते. यावेळचे नूर आणि अल पचीनो यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 
एका रिपोर्टनुसार, नूर ही एका कुवेती अमेरिकन कुटुंबातील मुलगी आहे, यापूर्वी तिचं नाव 78 वर्षाचा गायक मिक जेगर आणि 60 वर्षाच्या निकोलस बर्गग्रेन यांच्याशी जोडले गेले होते. काही वर्षांपूर्वी ती 91 वर्षीय चित्रपट निर्माते क्लिंट ईस्टवुडसोबत स्पॉट झाली होती, याबाबत तिनं सांगितलं होतं की, क्लिंट हा तिचा फक्त एक  मित्र होता. नूरनं काही दिवसांपूर्वी अल पचीनोसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.


83 व्या वर्षी बाप होणाऱ्या अभिनेत्याची 29 वर्षाची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?