बातम्या

हातकणंगलेत कोण बाजी मारणार?

Who will win in hand to hand combat


By nisha patil - 5/5/2024 4:44:38 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात व हातकणगले मतदारसंघात दिवसेंदिवस निवडणूक वातावरण चांगले तापले असताना. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातच तळ ठोकल्याने हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली आहे.हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने,सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी रिंगणात आहेत.

त्यामुळे माने आपला गड राखणार की सत्यजित पाटील त्यावर आपला झेंडा रोवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.त्यात हातकणंगले मतदारसंघात प्रथमच पश्चिम भागातून तगडा उमेदवार मिळाल्याने या भागात कमालीचा उत्साह दिसून येत आहे.तसेच परंपरागत इचलकरंजी परिसरातून यंदा माणूस बदलून पाहूया भूमिकेत लोक येताना दिसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.तसेच उबाठा गट कमालीचा आक्रमक झाला असून काहीही करून जिंकायचेच असा चंग बांधून कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून काम करत आहेत.त्यामुळे सत्यजित पाटील यांनीच या मतदारसंघात खरी चुरस निर्माण केल्याचे चित्र आहे.

त्यामुळे सत्यजित पाटील डार्क हॉर्स ठरणार का हे पाहणे महत्वाचे आहे.तसेच धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री तळ ठोकून आहेत त्यामुळे मतदार काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.राजू शेट्टींनी नेहमीप्रमाणे आपला प्रचार एकला चलो रे सुरू ठेवला आहे.परंतु काट्याची टक्कर धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यात होणार असल्याचे दिसत आहे.परंतु सध्यातरी सत्यजित पाटील यांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


हातकणंगलेत कोण बाजी मारणार?