बातम्या
हातकणंगलेच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
By nisha patil - 3/6/2024 6:24:50 PM
Share This News:
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत हातकणंगलेच्या राजकारणाची दिशा बदलल्याचं दिसून आलं. त्याचाच परिणाम म्हणून ठाकरे गटाकडून ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात आलेले माजी आमदार सत्यजित पाटील यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि राजी शेट्टी यांनी जोरदार लढत देत प्रचारात आघाडी घेतली. मतदानाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.
हातकणंगले मतदारसंघ हा राज्यातील शेवटचा म्हणजे 48 व्या क्रमांकाचा मतदारसंघ. या ठिकाणचे मतदार हे राजकीयदृष्ट्या अधिक सजग असल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील हातकणंगलेकरांनी भरघोस मतदान केलं. यंदा हातकणंगलेत 71. 11 टक्के मतदान झालं असून गडचिरोली आणि कोल्हापूरनंतर हे तिसऱ्या क्रमांकाचं मतदान आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा एक टक्का मतदान जास्त झालं आहे.
हातकणंगलेच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
|