बातम्या

आज दसरा मेळाव्यात आव्वाज कुणाचा? ठाकरे की शिंदेंचा

Whose voice in the Dussehra gathering todayThackeray or Shinde


By nisha patil - 10/24/2023 4:23:29 PM
Share This News:



आज दसरा मेळाव्यात आव्वाज कुणाचा? ठाकरे की शिंदेंचा 

  शिंदेंचा  शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर ; उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर

या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याच लक्ष 

 मुंबईमध्ये आज दोन मोठे मेळावे पार पडणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे दोन मेळावे होणार आहे. दोन्ही गटाकडून मोठं शक्तिप्रकदर्शन होणार आहे. यंदा या दसरा मेळाव्याचा दुसरं वर्ष असून दोन गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी देखील पूर्ण झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाकडून आमच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या मेळाव्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत.


आज दसरा मेळाव्यात आव्वाज कुणाचा? ठाकरे की शिंदेंचा