बातम्या

शारदीय नवरात्रीत सप्तधान्य का पेरले जाते? जाणून घ्या आरोग्यदायी महत्त्व

Why Sapthadhaya is sown in Sharadiya Navratri Know the importance of healthy


By nisha patil - 12/10/2023 7:13:53 AM
Share This News:



शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबर म्हणजे येत्या रविवारपासून सुरू होत आहे. आश्विन महिन्यातील शुल्क प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. यंदा नवरात्री 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.


नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दूर्गा देवीची पूजा केली जाते. देशभरात हे नऊ दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. यावेळी घरोघरी घट बसविले जातात. यामध्ये सप्तधान्य पेरले जाते. धान्यच का पेरले जाते आणि या धान्याचे आरोग्यदायी फायदे समजून घ्या.

घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते. याला सप्तधान्य म्हणून ओळखले जाते. या सप्तधान्यात प्रामुख्याने जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश असतो. शास्त्रानुसार धान्य हे ब्रम्हदेवाचे स्वरुप मानले जाते. जर धान्याचे अंकुर २ ते ३ दिवसात आले तर ते अतिशय शुभ मानले जाते. तसेच नवरात्रीत (Navratri) विड्याच्या पानाला देखील अधिक महत्त्व आहे. कलशात विड्याचे पान आणि नारळ ठेवल्यानंतर घटस्थापनेला पूर्णत्व प्राप्त होते. प्रत्येक धान्याचे आरोग्यदायी फायदे समजून घेऊया.

जव

जव त्याच्या आरोग्याच्या फायद्यांमुळे जगभरात खूप लोकप्रिय आहे. याद्वारे अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित आजारांवर उपचार केले जातात. जवामुळे पचनक्रिया सुधारते, पोट कमी होण्यास मदत होते. डायबिटिस कंट्रोल करण्यासाठी देखील जव वापरले जाते.

तीळ

सकाळी रिकाम्या पोटील तीळ खाल्ल्यास जबरदस्त फायदे होतात. हाडे, दात आणि हिरड्या मजबूत करण्याचे काम तीळ करतात. तसेच पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास तीळ मदत करतात.

तांदूळ

भात खाण्याचे शरीराला खूप फायदे होतात. भात खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देखील मिळते. हाडे आणि स्नायू देखील मजबूत होतात.

मूग

मूग खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब, घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करू शकतात. मूग हे फायबरचा एक चांगला स्रोत समजले जाते. ज्यामुळे पचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाचे सेवन करतात.

बाजरी

बाजरीत सोडियम, प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळतात. पचनसंस्था मजबूत होते, पोटदुखी आणि गॅस सारख्या समस्या दूर करतात. तसेच मुलाचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते.

चणे

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी चणे खूप फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काळ्या हरभऱ्याचा समावेश करावा. कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोलमध्ये राहतो.

गहू

हाडांच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी गव्हाचा वापर केला जाऊ शकतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तसेच उच्च रक्तदाबासाठी गहूचा वापर केला जातो.


शारदीय नवरात्रीत सप्तधान्य का पेरले जाते? जाणून घ्या आरोग्यदायी महत्त्व