बातम्या

सूर्यनमस्कार का घालायचे.?

Why Surya Namaskar


By nisha patil - 2/7/2023 7:24:35 AM
Share This News:




आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैरे अवयव आहेत, असे आपल्याला शाळेत आठवी, नववीमध्ये असताना शरीर शास्त्रात शिकवले आहे. यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.

एक दिवस एक फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले. अन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की आकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवश्‍यक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवश्‍यक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही.

पण सूर्यनमस्कार घालण्यामुळे ते होते. सूर्यनमस्कारात आपण खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर उजवा पाय दुमडतो व डावा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते.

नंतर उठताना डावा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, याचा प्रोस्टेट ग्लॅंडला व स्त्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. सूर्यनमस्कारासाठी झोपण्याएवढीच जागा लागते. दररोज 12 ते 15 सूर्यनमस्कार घालायला 10 ते 15 मिनिटे लागतात. सूर्योपासनाही होते. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्यायेण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो. पोट आणि पाठीचे व्यायाम प्रकार मधुमेह ना केवळ नियंत्रित ठेवतात तर बहुतेकदा तो समूळ नष्ट करण्यास मदतही करतात. आम्ही याचे फायदे विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांमध्येही पाहिलेच आहेत.


सूर्यनमस्कार का घालायचे.?