बातम्या
भावजंय, पुतणे ते सख्खा भाऊ अजित पवारांच्या विरोधात का गेले?
By nisha patil - 3/18/2024 9:31:42 PM
Share This News:
पुणे : कुटुंबात मला एकटे पाडले जाईल, तुम्ही तरी मला साथ द्या अशी भावनिक हाक अजित पवारांनी बारामती दिली होती. त्यानंतर अजित पवारांना खरंच कुटुंबात एकटं पाडल्याचं समोर येत आहे. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. तर भावजय शर्मिला पवार देखील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरल्या आहेत. कुटुंबाने एकट पाडलं असलं तरी कार्यकर्त्यांनी एकट पाडू नये अशी विनंती अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केली होती. त्यामुळे आता अजित पवारांना कुटुंबांना एकट पाडलं असल्याची चर्चा रंगू लागली.
अजित पवार भाजपसोबत गेले, परंतु अजित पवारांचे भाजपसोबत जाणं हे पवार कुटुंबीयांना रुचलं नाही. त्यामुळे आता अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार या अजित पवारांच्या विरोधात आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ प्रचारात उतरल्या आहेत आणि पुन्हा एकदा राजकारणाच्या राजकारणात चर्चा रंगू लागली. सख्खा पुतण्या काकांच्या विरोधात
अजित पवार जे बोलले ते आता सत्यात उतरताना दिसते. सुरुवातीला अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरला. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवार यांनी भव्य कुस्तीचे मैदान बारामतीत आयोजित केलं होतं. त्यानंतर थेट आत्यासाठी योगेंद्र पवार बारामती प्रचार करताना पाहायला मिळतात. दर निवडणुकीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबातले माझे भाऊ, वहिनी माझा प्रचार करतील असं सुप्रिया सुळे बारामतीत म्हणाल्या होत्या आणि घडलंही तसंच.
बारामतीतील पत्र व्हायरल मधल्या काळात बारामतीकरांची भूमिका या नावाने एक सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाला होतं. यामध्ये थेट पवार कुटुंबातील अंतर्गत गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्यावरून राजेंद्र पवारांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला होता. राजेंद्र पवारानंतर सुनंदा पवार आणि सई पवार इंदापूरमध्ये प्रचार करताना पाहायला मिळाल्या.
सगळं कुटुंब अजित पवारांच्या विरोधात अजित पवारांनी भावनिक आवाहन केल्यानंतर पवार कुटुंबातील इतर सदस्य सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. युगेंद्र पवार, सुनंदा पवार, सई पवार राजेंद्र पवार आणि त्यानंतर आता शर्मिला आणि श्रीनिवास पवार प्रचारासाठी बाहेर पडले आहेत आणि त्यांनी थेट अजित पवारांना टीका करायला सुरुवात केली. रोहित पवार तर आधीपासूनच काकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसले आहेत.
इंदापूर आणि पुरंदरमध्ये विरोध
एकीकडे भाजपने आणि अजित पवारांना सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचवेळी महायुतीतल्या बेबनाव देखील समोर येताना दिसत आहे. एकीकडे इंदापुरात हर्षवर्धन पाटील तर दुसरीकडून पुरंदरमध्ये विजय शिवतारे हे अजित पवारांचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत. तर विजय शिवतारे यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे याचा फटका आगामी काळात सुनेत्रा पवारांना बसणार असल्याचं चित्र आहे.
वस्तादाने डाव राखून ठेवला?
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. सुनिता पवारांचा प्रचार देखील बारामतीत सुरू केला आहे. या प्रचारात सुनेत्रा पवार आणि जय पवार हे घरोघरी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर शरद पवारांचा पराभव महत्त्वाचा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
अजित पवारांच्या विरोधात आता थेट श्रीनिवास पवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अजित पवारांचे समर्थक श्रीनिवास पवार यांचा विरोध करत आहेत. तर शरद पवारांचे समर्थक श्रीनिवास पवार यांचे समर्थन करताना पाहायला मिळतात.
शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणात आले, मात्र आता अजित पवारांनी काकांची साथ सोडली. ज्या शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात तयार केलं, या अजित पवारांनी काकांची साथ सोडली. यामुळे आगामी काळात कोण कोणाला चित करतं हे पाहणे महत्त्वाचा असणार. त्यामुळे वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो महाराष्ट्राच्या जनतेला कळेल.
भावजंय, पुतणे ते सख्खा भाऊ अजित पवारांच्या विरोधात का गेले?
|